A-20, Amargyan Industrial Estate, Opp. Akruti SMC, Khopat, Thane (W)
9819193643 / 9833000566
25474945/47

The Suresh Haware Startup Show

प्रथितयश उद्योजक, अणूशास्त्रज्ञ, नॅनो हौसिंगचे प्रणेते डॉ. सुरेश हावरे, गेली पाच वर्षे युवकांमध्ये उद्योजकता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. सुरेश हावरे यांनी ‘द सुरेश हावरे स्टार्टअप शो’ ची निर्मिती केली आहे. आयडिया हेच नव्या युगाचे कॅपिटल आहे. त्यासोबतच टेक्नोलॉजीची जोड दिल्यास अनलिमिटेड एक्सपांडीबिलिटीचे उद्योग उभारणे शक्य आहे. अशा उद्योगांना स्टार्टअप उद्योग म्हटले जाते. स्टार्टअप उद्योग ही काळाची गरज आहे. अनेक तरुणांना स्टार्टअपचे जग समजून घेण्याची उत्सुकता आहे. I.I.T’S, I.I.M’S, B.Schools, ग्रॅज्युएटस व अन्य महाविद्यालयीन विद्यार्थी असे अनेक तरुण स्टार्टअप्स शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘द सुरेश हावरे स्टार्टअप शो’ प्रसारित होणार असल्याची माहिती या शोचे संशोधक, संकल्पनाकार आणि सूत्रसंचालक डॉ. सुरेश हावरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. डॉ. सुरेश हावरे म्हणाले, देशात आणि आपल्या राज्यात कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. स्टार्टअपचे अभियान सुरु झाले आहे. या शोच्या माध्यमातून डॉ. सुरेश हावरे यांनी नवउद्योजकतेला चालना देणारे वातावरण निर्माण करण्यात मोठा हातभार लावला आहे. युवकांमध्ये उद्योजकता वाढावी यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. याच बरोबर ‘उद्योग तुमचा पैसा ​दुसऱ्याचा’ या पुस्तकाचे लेखन व ‘उद्योग करावा ऐसा’ व ‘Doing Business without your Money’ या पुस्तकांचे लेखन तसेच उद्योगावर आधारित एक मालिका निर्मितीही त्यांनी केली. यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्योग चळवळीचे वातावरण निर्माण होण्यासाठी हातभार लागला. नव्या संकल्पनांचे रुपांतर उद्योगात होत आहे. पारंपरिक उद्योग व्यवसायाच्या वाटा सोडून नव्या संधीच्या शोधात नवे उद्योग तयार होत आहेत. छोट्या शहरातून आणि ग्रामीण भागातून उद्योजकता विकसित होत आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे एक नवी उद्योग क्रांती होत आहे. यातून नवे उद्योजक तयार होत आहेत. या शो च्या माध्यमातून कृषी, कौशल्य विकास, मनोरंजन, शिक्षण, हाउस किपिंग, फूड इंडस्ट्री, गेम्स, ऑटोमोबाईल सर्व्हिसेस, ई मार्केटिंग अशा विविध उद्योगात तंत्रज्ञानाचा नेमका आणि प्रभावी वापर करून यशस्वी स्टार्टअप उद्योग ठरलेल्या तरुणांवर आधारित हा शो एकाच वेळी पाच वृत्त आणि मनोरंजन वाहिनीवरून प्रसारित होईल. यामध्ये असीम खरे, शुश्रुत मुंजे, धीरज गवळी, वरुण खन्ना, अभिजित बेर्डे, पवन गुरव, निनाद वेंगुर्लेकर, प्रथमेश क्रीसंग, मंदार देसाई, पुरुषोत्तम पाचपांडे, जय आणि रेणू शिरुरकर, वैभव चव्हाण, सुनील जोशी, कैलास काटकर, संकेत देशपांडे, अजय रामसुब्रमणीयम आणि ११ वर्षाचा क्रीशिव अग्रवाल सहभागी झाले आहेत. एकूण विविध अशा २० स्टार्टअप उद्योगांचे विश्व या शो मध्ये उलगडले जाईल. उद्योगांच्या नव्या वाटा, स्टार्टअपमुळे होत असलेले बदल प्रेक्षकांना समजतील. नवउद्यमीना प्रेरणा देणारा हा शो २.५० कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन डॉ. सुरेश हावरे यांनी केले. मुंबईत फिल्मसिटीत या शोचे चित्रीकरण झाले असून, प्रत्येक स्टार्टअप उद्योगाला अनुरूप गीत, या शोचे वैशिष्टय ठरणार आहे. या शोची निर्मिती सारथी प्रोडक्शनने केली असून; अमोल धर्मे दिग्दर्शक आहेत. चित्रीकरण जेष्ठ सिने-छायाचित्रकार समीर आठल्ये यांनी केले आहे. रेश्मा कारखानीस, स्वप्नील लवाटे आणि खलील अभ्यंकर यांच्या गीतांना विनय राजवाडे यांनी संगीत दिले आहे. सारस्वत सहकारी बँक शोचे मुख्य प्रायोजक असून, विको लॅबोरेटरीज पावर्डबाय प्रायोजक आहेत. शोसाठी झोन स्टार्टअपने सहकार्य केले आहे.