A-20, Amargyan Industrial Estate, Opp. Akruti SMC, Khopat, Thane (W)
9819193643 / 9833000566
25474945/47

Digital Platform Launch

डिजीटल क्षेत्रात सारथीचे पदार्पण...

ठाणे, दि.३० जून: ठाण्यातील सारथी एंटरप्रायजेस या अग्रणी जाहिरात संस्थेने डिजीटल क्षेत्रात प्रवेश केला आहे. सर्वप्रकारच्या डिजिटल सेवा देण्यासाठी सारथी एंटरप्रायजेस सज्ज झाली आहे. सारथीच्या ह्या नव्या व्यावसायिक आघाडीचे उद्घाटन प्रथितयश उद्योजक, श्री साईबाबा शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते झाले. सारथी एंटरप्रायजेसचे अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक अमोल धर्मे यांनी काळाची पाऊले ओळखत, डिजिटल सेवां आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा सारथीचा नवा विस्तार हाती घेतला असल्याचे प्रतीपादन सुरेश हावरे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला टीजेएसबी बॅकेचे संचालक विद्याधर वैशंपायन, सीईओ सुनील साठे, तन्वी हर्बल्सच्या मेधा मेहंदळे, वास्तुराविराजचे डॉ रविराज आणि मंजुश्री अहिरराव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या नव्या उपक्रमामुळे जाहिरातदारांना एसएमएस, मेलर, वेब डिझाईनिंग, वृत्तपत्राच्या वेबसाईटवरील जाहिराती, सोशल मिडिया प्रमोशन, अॅडवर्ड कॅम्पेन, एसइओ, आणि फीडबॅक कॅलिंग अश्याप्रकारच्या अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. जाहिरातीच्या क्षेत्रातलं सारथी एंटरप्रायजेस याचं नव पाऊल जाहिरातदारांना उपयुक्त ठरेल असा विश्वास अमोल धर्मे यांनी व्यक्त केला.